कोल्हापूर : केरळ मधील सात हजार शेतकरी सदस्य असलेल्या संघमित्रा शेतकरी उत्पादक कंपनीचा तळसंदे मधील
डॉ.डी.वाय. पाटील शेती महाविद्यालयामार्फत कोल्हापूर जिल्हयाच्या अभ्यास दौरा प्रायोजित केला होता. या दरम्यान
सदस्यांनी तळसंदे महाविद्यालय तसेच कनेरी मठ येथे भेट देऊन सेंद्रिय शेती पाहणी केली.
यादरम्यान त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद येथे महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी व जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य
कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी संघमित्रा शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल अध्यक्षांनी माहिती सांगितली. त्यांच्या कंपनीला सात हजार शेतकरी जोडले
गेले असून त्यामध्ये २८ प्रकारचे शेती उत्पादनवर प्रक्रिया करून व आकर्षक पॅकेजिंग मध्ये मूल्यवर्धन करून बाजारात ती
उत्पादने त्यांच्या कंपनीमार्फत आणली जातात. त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना वर्षाला ओनम सणाच्या वेळी रुपये ४०
हजारापर्यंत बोनस दिला जातो.
यावेळी महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा राजश्री शाहू महाराजांचा समृद्ध वारसा,
जिल्ह्यातील सहकार चळवळीचा वारसा व सहकारी साखर कारखाने तसेच जिल्हा दूध उत्पादक संघबाबतची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अन्नप्रक्रियावर भर देतात तसेच
बचतगटातील महिला शेतकरी यांच्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे काजू प्रक्रिया, वन ऊत्पादन, मध, चप्पल क्लस्टर,
कोल्हापुरी चटणी मसाले, याबाबत माहिती दिली.
